Ad will apear here
Next
‘पुलं, गदिमा आणि बाबूजी हे युगनिर्माते’
पालकमंत्री गिरीश बापट यांचे गौरवोद्गार
‘स्वरशब्दांचे युगनिर्माते’ या विशेष कार्यक्रमाला पालकमंत्री गिरीश बापट, आमदार मेधा कुलकर्णी, सुमित्र माडगुळकर, श्रीधर फडके, डॉ. सुनील देव आदी मान्यवर उपस्थित होते.

पुणे : ‘पुलं, गदिमा आणि बाबूजी यांनी महाराष्ट्राच्या मनांवर राज्य केले. आता स्वर्गात देवांच्या समोर त्यांची मैफल चालू असेल, असे युगनिर्माते पुन्हा पृथ्वीतलावर होणे नाही,’ असे गौरवोद्गार पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी व्यक्त काढले. 

पु. ल. देशपांडे, ग. दि. माडगूळकर आणि सुधीर फडके यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त, त्यांच्या गीत, संगीत आणि साहित्यावर आधारित ‘स्वरशब्दांचे युगनिर्माते’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते.

महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग आणि मुक्तछंद यांच्या संयुक्त विद्यमाने ‘जीवनगाणी’ संस्थेने या कार्यक्रमाची निर्मिती केली होती. सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे, यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमदार प्रा. मेधा कुलकर्णी यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या वेळी सुमित्र माडगुळकर, श्रीधर फडके, डॉ. सुनील देवधर आदी मान्यवर उपस्थित होते. 


बाबूजी आणि गदिमांची, गोमू माहेराला जाते, चंद्र आहे साक्षीला, दिस जातील, एक धागा सुखाचा, माझे जीवन गाणे, सखी मंद झाल्या, कानडा राजा, इंद्रायणी काठी, गा बाळांनो, अशी अनेक अनेक गाजलेली गीते या वेळी सादर करण्यात आली. तर पुलंच्या फुलराणीमधील नाट्यप्रवेश, लता मंगेशकर यांनी पु. ल. देशपांडे यांना लिहिलेल्या पत्रांचे वाचन, तसेच पुलंनी संगीतबद्ध केलेल्या गाण्यांवर नृत्यरचना सादर करण्यात आल्या.

या कार्यक्रमात प्रसिद्ध गायक पं. उपेंद्र भट, सुवर्णा माटेगावकर, मंदार आपटे, स्वराली गोखले, दत्तात्रय मेस्त्री, मधुरा वेलणकर, योगेश देशपांडे, अरुण नूलकर, हेमांगी कवी, राजन जोशी, पराग माटेगावकर यांनी पुलं, गदिमा आणि बाबूजी यांची गीते, संगीत याचे सुंदर सादरीकरण केले.

प्रेक्षकांनी प्रचंड संख्येने या कार्यक्रमाला हजेरी लावली होती.  
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/VZHWBW
Similar Posts
गदिमा, पुलं आणि बाबूजींच्या आठवणींनी रंगली दिवाळी पहाट पुणे : ग. दि. माडगुळकर (गदिमा) यांच्या शब्दांची लय, पु. ल. देशपांडेंचा (पुलं) अजरामर विनोद आणि सुधीर फडके (बाबूजी) यांच्या अवीट चाली यांच्या साथीने पुणेकरांनी सुरेल पहाट अनुभवली. निमित्त होते ते त्रिदल, पुण्यभूषण फाउंडेशन, लायन्स इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट ३२३४ डी २ आणि कोहिनूर ग्रुप यांच्या वतीने आयोजित केलेल्या ‘तिहाई’ या दिवाळी पहाट कार्यक्रमाचे
वुमन्स आर्टिस्ट ग्रुपतर्फे चित्रशिल्प प्रदर्शन पुणे : महाराष्ट्राचे वाल्मिकी ग. दि. माडगूळकर, ज्येष्ठ संगीतकार, गायक सुधीर फडके आणि महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त ‘वुमन्स आर्टिस्ट ग्रुप’तर्फे चित्रशिल्प प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.  ‘यामध्ये पुलं, गदिमा आणि बाबूजी यांची महिला चित्रकारांनी
‘गदिमा...बाबूजी अन् बेरजेचे राजकारण’ पुणे : ‘गीतरामायण कार्यक्रमाच्या रॉयल्टीवरून सुधीर फडके (बाबूजी) आणि ग. दि. माडगूळकर (गदिमा) यांच्यामध्ये दुरावा वाढला. त्यांचा संवाद बंद झाला. महाराष्ट्राचे खूप नुकसान होईल, असे प्रत्येकजण म्हणू लागला. दरम्यान, सैनिकांच्या कल्याण निधीसाठी पुण्यात एका कार्यक्रमाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण आले होते
नगर वाचनालयातर्फे कथाकथन व निबंधलेखन स्पर्धा रत्नागिरी : सध्याचे वर्ष हे महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व पु. ल. देशपांडे (पुलं), आधुनिक वाल्मिकी म्हणून ओळखले जाणारे ग. दि. माडगूळकर (गदिमा) व संगीतातील अध्वर्यू व्यक्तिमत्त्व सुधीर फडके (बाबूजी) या त्रयीच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालयातर्फे निबंध व कथाकथन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language